महत्त्वाचे: आम्ही सध्या Google Search सेवांसाठी सेटिंग्ज अपडेट करत आहोत, ज्यामध्ये Search, Maps, Shopping, फ्लाइट, हॉटेल, Translate आणि News यांचा समावेश आहे. ही वैशिष्ट्ये पुढील काही महिन्यांमध्ये हळूहळू रोल आउट केली जातील. तुम्हाला दिसत असलेल्या गोष्टींशी या लेखामधील सेटिंग्ज जुळत नसल्यास, शोध सेवांसाठी इतिहास आणि पर्सनलाइझ केलेल्या शिफारशी या अजूनही वेब आणि अॅप अॅक्टिव्हिटी द्वारे नियंत्रित केल्या जात आहेत.
पर्सनलाइझ केलेल्या शिफारशी वापरल्यास, तुम्हाला काय आवडते आणि तुमची अॅक्टिव्हिटी यांनुसार Google Search सेवांमध्ये परिणाम, निवडक फीड व AI प्रतिसाद दाखवले जातात. जणू तुम्हाला काय शोधायचे आहे, हे ओळखण्याचा प्रयत्न Google करत असते.
टिपा:
- भाषा सेटिंग्ज किंवा लोकलाइझ केलेले परिणाम यांसारख्या पर्सनलायझेशनव्यतिरिक्त इतर कारणांमुळे, वेगवेगळ्या लोकांसाठी परिणाम वेगवेगळे असू शकतात. तुमचे Google Search परिणाम इतर लोकांपेक्षा वेगळे का असतात हे जाणून घ्या.
- तुम्हाला तुमचे Google खाते तुमच्या नियोक्त्याद्वारे किंवा शैक्षणिक संस्थेद्वारे मिळाले असल्यास, तुमच्या संस्थेला शोध सेवा आणि सेटिंग्ज वापरता यावीत, यासाठी तुम्हाला तुमच्या ॲडमिनिस्ट्रेटरला ठरावीक सेवांचा व सेटिंग्जचा ॲक्सेस सुरू करण्याची विनंती करावी लागू शकते.
शोध सेवांमध्ये पर्सनलाइझ केलेल्या शिफारशी कशा काम करतात
तुम्ही हे सेटिंग सुरू केल्यास, Google तुम्हाला तुमच्या Google खाते मधील माहितीच्या आधारे शोध सेवांमधील पर्सनलाइझ केलेल्या शिफारशी देऊ शकते.
उदाहरणार्थ, शोध सेवा पुढील गोष्टी पुरवू शकतात:
- तुमच्या स्वारस्यांशी जुळणारे परिणाम: तुम्ही बऱ्याचदा “टेनिस" शोधत असल्यास, शोध सेवा त्या विषयाशी संबंधित परिणामांना प्राधान्य देतील.
- निवडक फीड: तुमची Google Search आणि News अॅप फीड यांमध्ये तुम्ही सर्वात जास्त पाहत असलेल्या बातम्या व विषय हायलाइट केले जातात.
- पर्सनलाइझ केलेले AI प्रतिसाद: AI द्वारे सक्षम केलेली वैशिष्ट्ये ही तुमच्या स्वारस्यांशी किंवा मागील शोधांशी विशेषतः सुसंबद्ध असलेली उत्तरे देऊ शकतात, जसे की टेनिसच्या उदाहरणासह भौतिकशास्त्र स्पष्ट करणे.
- स्थानावर आधारित सुसंबद्धता: तुम्हाला तुम्ही यापूर्वी शोधलेल्या सर्वसाधारण स्थानाशी सुसंबद्ध परिणाम दिसतील. उदाहरणार्थ, तुमचे सद्य स्थान उपलब्ध नसल्यास, तुमचे परिणाम सुधारित करण्यासाठी मागील शोधांमधील सर्वसाधारण स्थान वापरले जाऊ शकते.
तुमच्या शिफारशी पर्सनलाइझ करण्यासाठी वापरल्या जाऊ शकणाऱ्या तुमच्या Google खाते मधील माहितीमध्ये पुढील गोष्टींचा समावेश असतो:
- तुमचे वय, लिंग आणि घर व ऑफिसचे पत्ते यांसारखी प्रोफाइल माहिती
- तुमची लाइक, प्राधान्ये आणि सेव्ह केलेली माहिती, ज्यामध्ये तुमच्या वॉचलिस्टमध्ये जोडलेले आयटम, तुम्ही सेव्ह केलेली ठिकाणे किंवा तुम्ही लाइक केलेले लेख यांसारख्या गोष्टींचा समावेश असतो
- तुमच्या सेटिंग्जनुसार, Google साइट आणि अॅप्स यांवरील तुमची अॅक्टिव्हिटी व आशय, ज्यामध्ये तुम्ही ती जिथे वापरली, त्या सर्वसाधारण स्थानांचाही समावेश होतो. g.co/privacypolicy/location इथे स्थान माहितीबद्दल अधिक जाणून घ्या
- तुम्ही तुमच्या Google खाते सह लिंक केलेल्या तृतीय पक्ष सेवांमधील डेटा
टीप: Google ला तुमच्याबद्दल अधिक जाणून घेता यावे आणि तुम्हाला अधिक सुसंबद्ध अनुभव मिळावा यासाठी, तुमचा शोध सेवा इतिहास सुरू करा.
पर्सनलाइझ केलेल्या शिफारशी हे सेटिंग बंद असताना काय बदलते हे जाणून घ्या
हे सेटिंग बंद असताना, शोध सेवा तुमच्या शिफारशी पर्सनलाइझ करणार नाहीत, पण तरीही तुमच्या सद्य संदर्भाच्या आधारे आणि तुम्ही सेव्ह केलेल्या माहितीच्या आधारे तुमचा अनुभव काही प्रमाणात अनुकूल केला जाईल.
तुमचा सद्य संदर्भ तरीही कसा वापरला जातोतुम्हाला मिळणारे परिणाम उपयुक्त व सुसंबद्ध असल्याची खात्री करण्यासाठी, शोध सेवा अजूनही सद्य संदर्भ वापरतात. उदाहरणार्थ:
- सद्य स्थान: जसे की तुमच्या आयपी अॅड्रेसच्या किंवा तुमच्या डिव्हाइसच्या स्थानाच्या आधारे, तुम्हाला “माझ्या जवळपासचा पिझ्झा” शोधण्यात अथवा तुमच्या शहरातील स्थानिक हवामान जाणून घेण्यात मदत करणे.
- भाषा आणि डिव्हाइसचा प्रकार: पेज तुमच्या प्राधान्य दिलेल्या भाषेमध्ये असल्याची आणि तुमच्या विशिष्ट स्क्रीनवर योग्यरीत्या दिसत असल्याची खात्री करण्यासाठी.
- अलीकडील शोध: तुम्ही सध्या काय शोधत आहात याचा संदर्भ समजून घेण्यासाठी.
- मागील शोध: तुमचा शोध सेवा इतिहास सुरू असल्यास, ऑटोकंप्लीट परिणामांमध्ये या गोष्टी दिसू शकतात.
- सेव्ह केलेले पत्ते: यामुळे, तुम्ही “घर” किंवा “ऑफिस” याच्या जवळपासच्या एखाद्या गोष्टीबद्दल विचारल्यास, तुम्हाला काय म्हणायचे आहे हे समजून घेण्यास शोध सेवांना मदत होते.
- सेव्ह केलेले आयटम: हे शोध सेवांवर दिसत राहतील. यामध्ये Maps मधील तुमची सेव्ह केलेली ठिकाणे, तुमचे संग्रह यांमधील आयटम आणि तुमच्या चित्रपटांच्या किंवा स्टॉकच्या पाहण्याच्या सूची यांसारख्या गोष्टींचा समावेश असतो.
- सदस्यत्वे: यामध्ये तुमच्या Google खाते शी लिंक केलेल्या बातम्यांच्या प्रकाशकांच्या सदस्यत्वांचा समावेश आहे. तुम्हाला त्या आशयाचा अॅक्सेस मिळावा यासाठी, Google News तरीही ही सदस्यत्वे ओळखेल.
- तुमच्या Google खाते मध्ये शोध सेवा इतिहास किंवा इतर अॅक्टिव्हिटी बंद करणे अथवा हटवणे: तुम्ही myactivity.google.com इथे तुमची Google अॅक्टिव्हिटी व्यवस्थापित करू शकता.
- इतर Google सेवांमधील पर्सनलायझेशन बंद करणे: तुम्ही goo.gle/personalization-settings इथे मुख्य पर्सनलायझेशन सेटिंग्ज व्यवस्थापित करू शकता.
- ऑटोकंप्लीट सूचना बंद करणे: शोध सेवा इतिहास सुरू असेपर्यंत, तुम्ही टाइप करत असताना तुम्हाला शोध बारमध्ये तुमचे स्वतःचे मागील शोध अजूनही सापडू शकतात.
- अॅपची प्राधान्ये बदलणे: गडद मोड, तुमची प्राधान्य दिलेली भाषा किंवा प्रति पेज परिणामांची संख्या यांसारखी सेटिंग्ज तशीच राहतात.
- सेव्ह केलेले आयटम हटवणे: तुमचे संग्रह, तुम्ही फॉलो केलेले स्टॉक आणि घराचे किंवा ऑफिसचे सेव्ह केलेले पत्ते यांवर परिणाम होत नाही.
पर्सनलाइझ केलेल्या शिफारशी सुरू किंवा बंद करणे
- तुमच्या Google खाते वर जा.
- तुम्हाला साइन इन करण्यास सांगितले जाऊ शकते.
- डेटा आणि गोपनीयता वर क्लिक करा.
- पर्सनलायझेशन सेटिंग्ज वर क्लिक करा.
- शोध सेवांमधील पर्सनलाइझ केलेल्या शिफारशी सुरू किंवा बंद करा.
- किंवा तुम्ही थेट google.com/search-personalization वर जाऊ शकता.